By  
on  

या बोल्ड अभिनेत्रीला आहे स्केचिंगची आवड, रेखाटलं स्वत:चं चित्र

कोरोना व्हायरसचा देशातच नाही तर जगभरात सुळसुळाट आहे. त्यातच देशात लॉकडाउनमुळे सगळे घरी आहेत. मात्र मिळालेल्या या वेळेत करायचं काय असा प्रश्न जरी पडत असला तरी याचं  उत्तर या वेळेतच सापडतय. या वेळेत बहुतांश लोक त्यांचे छंदही जोपासत आहेत. विशेषकरून कला विश्वातील कलाकार या वेळेत त्यांची हौस पूर्ण करत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I have 2 sides ( 2 players) I sketched myself.

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial) on

'शिकारी' सिनेमातील बोल्ड भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री नेहा खानला स्केचिंगची आवड आहे. लॉकडाउनमुळे  तिही घरात आहे आणि तिचा हा छंद जोपासत आहे. नेहाने पुन्हा बऱ्याच वर्षांनी स्केचिंगला सुरुवात केली आहे. शिवाय नुकतच तिनं स्वत:चं आणि तिच्या आईचं चित्र रेखाटलं आहे. त्याचा व्हिडीओही तिने पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I Sketched my Beautiful Mom...

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial) on

 

नेहा खान सध्या 'युवा डान्सिंग क्विन' या डान्स रिएलिटी शोमध्ये झळकतेय. सध्या या कार्यक्रमाचे रिपीट टेलेकास्ट पाहायला मिळत आहे. नेहाला आधीपासून नृत्याची आवड आहे. या शोमधील तिच्या डान्सचं कौतुक होत आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Last one I promise

A post shared by Neha Khan (@nehakhanofficial) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive