By  
on  

Photo : बिग बॉस फेम सई लोकुरने चक्क परिधान केला उशीचा ड्रेस, दिसली खुप क्यूट

सध्या करोनाने देशभरात थैमान घातलंय आणि त्याला आळा घालण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वच घरी कैद आहेत. मग काय रिकाम्या डोक्यात काय सुचेल नी काय नाही ह्याचा नेटक-यांमध्ये नेमच नाही. काय तर म्हणे चक्क घरातली उशी कपड्यांऐवजी बांधून त्याचा ड्रेस जो घालेल आणि त्याला तो परफेक्ट दिसेल त्याने हे चॅंलेंज तंतोतंत पूर्ण केलं. या भन्नाट चॅलेंजचं नावही पिलो चॅलेंज आहे. 

हिंदी सिनेसृष्टीत बरंच गाजत असलेलं हे पिलो चॅलेंज चक्क आपल्या मराठमोळ्या बिग बॉस फेम सई लोकुरने ते स्विकारलं व अनोख्या स्टाईलने पूर्णही केलं. या चॅलेंज स्विकारल्यानंतरचे फोटो खुद्द सईनेच आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत आणि  त्यात ती खुपच क्यूट दिसतेय ..अगदी मिकी माऊसच्या कार्टूनमधली गोड मिनी.  या फोटोमध्ये तिने उशीचा ड्रेस म्हणून वापर केला आहे. तिने ही उशी निळ्या रंगाच्या रिबीनने बांधली आहे. तसेच त्याच्यावर मॅचिंग असा निळा रंगाचा पोलका डॉटचा हेअर बॅण्ड, गळ्यात निळ्या रंगाचा नेकलेस परिधान केला आहे

 

सई लोकुरच्या या क्यूट फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा अगदी वर्षाव केला आहे. सई बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील अतिशय लोकप्रिय स्पर्धक होती. मेघा धाडे, पुष्कर जोग आणि सई लोकूर या त्रिकूटाची त्यावेळी विशेष चर्चा पर्वात पाहायला मिळायची. सई मराठी सिनेमातही झळकलीय तसंच कपाील शर्मा सोबत किस किस को प्यार करु या हिंदी सिनेमातही तिने काम केलं आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive