By  
on  

पाहा Video : निसर्ग मला जादुमय वाटतो – अश्विनी भावे

अभिनेत्री अश्विनी भावेही या लॉकडाउनच्या काळात अमेरिकेतील त्यांच्या घरी आहेत. मात्र त्यांचं निसर्गप्रेम आणि विशेषकरून त्यांच्या बागेतील झाडा फुलांविषयीचं त्यांचं प्रेम आपण त्यांच्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहतो.

या लॉकडाउनच्या काळात अश्विनी भावे त्यांच्या बागेतही वेळ घालवत आहेत. त्यातच त्यांना एक आनंदाची बातमीही मिळाली आहे.त्यांच्या बागेतील काही वृक्षांना पालवी फुटलेली पाहून त्यांना प्रचंड आनंद झाला आहे. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून हा आनंद शेयर केला. त्या या पोस्टमध्ये म्हणतात की, “निसर्ग मला जादुमय वाटतो. हिवाळ्यात या झाडांवरची एकूणएक पानं गळून पडली. पण हिवाळ्यात त्यांच्याकडे पाहून मला दुख व्हायचं पतर यांना पालवी कधीच फुटणार नाही असं वाटायचं. पण आपापली वेळ झाली की त्यांना पालवी फुटते. कोवळी पानं येत आहेत. काही महिन्यांनी यांना फुल धरतील मग फळं.” 
असं म्हणत अश्विनी भावे यांनी त्यांच्या बागेतील विविध झाडं या व्हिडीओतून दाखवली आहेत. झाडांना फुटलेली पालवी पाहून त्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद यात साक्षात दिसतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive