मुलाच्या तालावर अशी थिरकली माधुरी, मुलाला शिकवलं कथक

By  
on  

सध्या सगळेच घरात बसून काहीना काही उद्योग करत आहेत. निमित्त आहे लॉकडाउनचं मात्र यानिमित्ताने बराच वेळ आपल्यापुढे आणून ठेवलाय. या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे आपल्या हातात आहे. त्यामुळे बहुतांश लोकं या वेळेत त्यांचा छंद जोपासत आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षितही घरात बसून तिचा छंद जोपासत आहे.

माधुरी दीक्षितला नृत्याची प्रचंड आवड आहे सगळ्यांनाच माहित आहे. आणि म्हणूनच घरात बसून माधुरी सध्या कथकचा रियाज करतेय. एकीकडे  मोबाईलवर तबल्याचा ताल तर दुसरीकडे माधुरी त्या तालावर कथकचा सराव करतेय. मात्र यात आता माधुरीचा मुलगा आरीनही सहभागी झाला आहे. माधुरीचा मुलगा आरीनला तबला वाजवण्याची आवड आहे. त्यामुळे जेव्हा माधुरी कथकचा सराव करते  तेव्हा आरीनही तबला वाजवतो. नुकताच माधुरीने एक व्हिडीओ शेयर करून याविषयीची माहिती दिली. सोशल मिडीयावर या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होतोय. आई-लेकाला असं एकत्र पाहून सगळ्यांनाच छान वाटतयं. मात्र या व्हिडीओच्या शेवटी माधुरी आरीनला कथक शिकवतानाची मजेशीर मोमेंटही मिस करून नका.

 

 

Recommended

Loading...
Share