By  
on  

'स्ट्रॉबेरी शेक'चा ट्रेलर प्रदर्शित, लवकरच लघुपट होणार प्रदर्शित

अभिनेत्री ऋता दुरगुळे आणि अभिनेता सुमीत राघवन एका लघुपटाच्या निमित्ताने एकत्र झळकत आहेत. 'स्ट्रॉबेरी शेक' असं या लघुपटाचं नाव असून येत्या 15 एप्रिलला हा लघुपट प्रदर्शित होत आहे. 

या लघुपटात सुमीत राघवन वडिलांच्या आणि ऋता त्यांच्या मुलीची भूमिका साकारतेय. अभिनेता रोहीत फाळकेही या लघुपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. एका कुल बाबाची आणि त्याच्या मुलीची ही कथा आहे. नुकताच या लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या लघुपटाच्या निमित्ताने ऋता आणि सुमीत राघवन पहिल्यांदाच एकत्र झळकतील. 

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये मुलगी वडिलांना तिच्या बॉयफ्रेंडची ओळख करून देत असल्याचं पाहायला मिळतय. नक्कीच हा लघुपट मजेशीर आणि रंजक असेल हे या ट्रेलरवरून पाहायला मिळतय. झी 5वर हा लघुपट प्रदर्शित होणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive