By  
on  

Lockdown Effect : आवडत्या गाण्यावर अशा मनोसोक्त थिरकल्या सुप्रिया पिळगावकर

करोना संकटाने आज भारतासह संपूर्ण जग हादरुन गेलं आहे. ही लढाई फक्त रोगाविरोधातच नाही तर आर्थिक संकंट, अन्नाचं संकट , बेकारी अशा सर्वच बाजूंनी सुरु झाली आहे. पंतप्रधानांनी देशवासियांचा ३ मेपर्यंत लॉकडाऊन काळ वाढवला आहे. घरात राहा, सुरक्षित राहा असं आवाहन करण्यात आलं आहे. 

आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत.  मराठी सिनेसृष्टीसह -हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या प्रतिभासंपन्न अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पिळगावकर. ९०च्या दशकांत सचिन पिळगावकर यांच्यासोबत धम्माल उडवून देणा-या सुप्रियाजींनी नुकताच लॉकडाऊन दरम्यानचा त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

जुन्या काळातली म्हणजे ७०-८०च्या दशकातल्या सिनेमातली बॅकग्राऊंड डान्सर वाटते का याची टेस्ट सुप्रिया पिळगांवकर यांनी घेतली आणि छान तयार होऊन त्यांनी घरातच जा रे जा....या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त ताल धरला.त्यांचा हा डान्स खुपच सुरेख झाला आहे.  सर्वांनीच त्यांच्या ह्या व्हिडीओवर कॉमेंट्स व लाईक्सचा वर्षाव केला आहे. म्युझिक सुरु होण्यापूर्वी मला थोडं लाजल्यासारखं वाटत होतं, पण नंतर मी स्वत: खुपच एन्जॉय केलं, असं सुप्रियाताई पोस्टमध्ये म्हणाल्या. 

 

सुप्रिया पिळगावकर यांच्यासारखं प्रत्येकाने आपल्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यामुळे हा लॉकडाऊन काळ नक्कीच सुखद होईल.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive