By  
on  

अमेय वाघ विचारतो, ह्या lockdown मध्ये “रात्रीची जादू” आठवतीये का कोणाला?

करोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. दररोज राज्यासह देशात करोना रुग्णांची होमारी लक्षणीय वाढ ही चिंतेची बाब आहे. खबरदारी म्हणून प्रत्येकानं घरी राहावं, सुरक्षित राहावं. 
आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. असाच जुन्या आठवणीत रममाण झाला आहे आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिध्द असलेला अभिनेता अमेय वाघ. 

'दिल दोस्ती दुनियादारी' ही जीवाला जीव देणा-या सहा दोस्तांची कहाणीने छोटा पडदा गाजवला होता. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे.अनेकजण आज ही मालिका ऑनलाईनसुध्दा पाहात असतात. हेच त्या मालिकेच्या यशाचं गमक आहे. या मालिकेत कैवल्य ही बिनधास्त बेफिकर तरुणाची व्यक्तिरेखा साकारणारा अमेय वाघने मालिकेतल्या एका भागातला सीन खास शेअर करत या लॉकडाऊननिमित्त चाहत्यांना तुम्हाला याची आठवण येते का म्हणून विचारलं आहे. 

 

रात्रीची जादू असं म्हणत अमेयने या मालिकेतल्या या भागाच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. साधी-सोज्वळ तरुणी साकारणारी अभिनेत्री सखी गोखले व कैवल्यच्या भूमिकेतील अमेय वाघ यांच्यात या भागात रात्री कोण संपूर्ण जागं राहूू शकतं, यावरुन पैज लागते. कैवल्य हा सकाळी उशिरा उठत असला तरी त्याचं खरं काम रात्रीचं सुरु होतं. म्युझिकच्या ट्यून्स सुचण्यासाठी त्याला रात्रीची शांतता आवडते. तर सकाळपासून घरकामात-बाजारहाट यात व्यस्त असलेल्या रेश्माला रात्री वेळेत झोपायचं असतं. म्हणूनच ही पैज कोण जिंकतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हा भाग ऑनलाईन पुन्हा पाहू शकता.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive