By  
on  

पाहा Video : मुलांसाठी अभिनेता सुबोध भावे बनला न्हावी 

लॉकडाउनच्या या काळात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी सगळ्यांना मिळाली आहे. मनोरंजन विश्वातील कलाकाल ऐरवी चित्रीकरणात व्यस्त असतात. मात्र या निमित्ताने तेही आपल्या कुटुंबासोबत घरात आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Aj finally babane hajamat keli.... @subodhbhave #filmybhaves

A post shared by Manjiri Subodh Bhave (@manjirisbhave) on

अभिनेता सुबोध भावेही त्यांच्या दोन मुलांसोबत, पत्निसोबत घरात छान वेळ घालवतोय. नुकताच पत्नि मंजिरी यांनी एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत अभिनेता सुबोध भावे चक्क मुलांचे केस कापताना दिसतोय. सध्या लॉकडाउनमुळे सगळचं बंद आहे. त्यात केशकर्तनालयही बंद आहेत. मग काय घरातच अभिनेता सुबोध  भावे न्हावी बनला आणि मुलगा मल्हार, कान्हाचे केस कापू लागला. हा गोड क्षण मंजिरी यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. आणि हा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. एवढच नाही तर सुबोध भावे आणि मुलं मिळून मंजिरी यांना घरकामातही बरीच मदत करत आहेत. घरात बसून भावे कुटुंब काय करत आहे हे त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवरून पाहायला मिळतय.

नाटक, मालिका, सिनेमे यांच्या चित्रीकरणात सतत व्यस्त असलेला अभिनेता सुबोध भावेला या निमित्ताने परिवारासोबत जास्तीत जास्त वेळ मिळाला आहे. हे क्षण तो आनंदाने घालवत असल्याचं या विविध व्हिडीओमधून समोर येत आहे. कला विश्वातील कलाकार सध्या सगळ्यांनाच घरात बसण्याचं आवाहन करत आहेत. या व्हिडीओच्या माध्यमातूनही घरात बसून कसे सकारात्मक राहाला हा संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive