पाहा Video : मिथिला पालकरने केलं जेनिफर लोपेजचं डान्स चॅलेंज

By  
on  

सोशल मिडीया आणि यूट्यूबवर चर्चेत असलेली मिथिला पालकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यूट्यूब स्टार ते मराठी आणि हिंदी सिनेमा असा प्रवास असलेल्या मिथिलाचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये मिथिला चक्क डान्स करताना दिसतेय. मिथिलाचं हे रुप याआधी कधीच पाहायला मिळालं नव्हते. जेनिफर लोपेजचा डान्स चॅलेंज एक्सेप्ट करत मिथिलाने हा डान्स व्हिडीओ केला आहे. मिथिलाचा हा डान्स पाहून तिच्या सेलिब्रिटी मित्रमंडळींनीही कमेंट्स करून तिचं कौतुक केलं आहे. या पोस्टमध्ये मिथिला म्हणते की, “#jlosuperbowlchallenge करायची हिंमत केली आहे. मोठी होत असताना मी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून नाचायला शिकायचे. काल संध्याकाळी मी खूप वर्षांनी यूट्यूबवर खूप वेळ घालवून हा डान्स शिकले.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Favourite kinda glow!

A post shared by Mithila Palkar (@mipalkarofficial) on

‘लिटील थिंग्ज’ या वेबसिरीजने मिथिलाने सगळ्यांचीच मनं जिंकली. शिवाय मराठीतील ‘मुरांबा’ आणि हिंदीतील ‘कारवा’ या सिनेमांमधूनही मिथिला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
 
 

Recommended

Loading...
Share