By  
on  

स्मोक करणं टाळा, त्यामुळे COVID-19 चा धोका वाढतो : भूषण प्रधान

देशातील सर्वात जास्त करोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्या तीन हजारांच्या पुढे गेली. तीन हजारापेक्षा जास्त रुग्ण असणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरलं आहे. सोबतच मुंबईतील करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या वर असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. आपल्या सरकारी यंत्रणा कोविड-१९ शी दोन हात करण्यासाठी .युध्द पातळीवर काम करतायत. मृत्यू दर कमी करण्यासाठी सरकारकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचं आरोग्यममंत्री राजेश टोपे यांनी नुकतंच सांगितलं. 

दरम्यान, सेलिब्रिटीसुध्दा करोनाविरुध्दच्या लढ्यात अनेक चांगल्या गोष्टींबद्दल. सवयींबद्दल जनजागृती करताना पाहायला मिळतात. भूषण प्रधानने नुकतीच एक जनजागृती करणारी व व्यसनमुक्तीला हातभार लावणारी एक पोस्ट केली आहे. 

भूषण आप्लया पोस्टमध्ये म्हणतो, " स्मोक करणं टाळा, त्यामुळे COVID-19 चा धोका अधिक वाढतो, आजपासूनच ही सवय सोडून द्या . दिवसाची एक सिगरेट किंवा सिगरेटचा एक झुरकासुध्दा तुमच्या जीवावर बेतू शकतो. हीच ती योग्य वेळ आहे, तुमचं व्यसन सोडवण्याची आणि उत्तम आरोग्य राखण्याची. कदाचित सुरुवातीला ही सवय सोडणं कठीण जाईल, परंतु तुमच्या घरासाठी व प्रियजनांसाठी ही वाईट सवय सोडण्याच्या पुन्हा प्रयत्न करा. यश नक्की मिळेल.   "

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Don't smoke. It can exacerbate COVID-19 symptoms and increase your risk of getting seriously sick. It's indeed a good time to quit the habit. This may look like a difficult habit to build but it isn't impossible. Smoking puts your health at stake and now that you are at home with your loved ones, you may find it easier to quit it. You constantly get motivation from your loved ones and that's what helps you more. Start with understanding that one cigarette or even one puff can hurt. Use this time to replace this negative habit with a positive one like you can try working out or meditating. Even if you fail by the end of the day, get up and try again. Quit Smoking today, please #BhushanPradhan #LockdownChallenge #QuitSmoking

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive