By  
on  

या मराठी अभिनेत्रीने वाजवलं ‘Money Heist’चं गाणं, चक्क आयुष्मान खुरानाने केलं कौतुक 

लॉकडाउनच्या काळात मनोरंजनासाठी बहुतांश लोक वेब दुनियेकडे वळले आहेत. यातच मनी हाइस्ट ही वेबसिरीज मोठ्या प्रमाणात पसंत केली जात आहे. या वेबसिरीजचं प्रेमात अभिनेता आयुष्मान खुरानाही पडलाय. नुकतच आयुष्मान खुरानाने या वेब सिरीजचं गाणं किबोर्ड वाद्यावर वाजवलं होतं. आणि त्याला या वेब सिरीजमधील प्रोफेसरची भूमिका साकारयची असल्याचं बोलला होता. 

हा व्हिडीओ पाहून मराठी अभिनेत्री अमृता देशमुख प्रेरीत झाली. ती पण सध्या किबोर्ड शिकतेय शिवाय तिला देखील ही वेब सिरीज प्रचंड आवडते. आणि म्हणूनच अमृतानेदेखील तिच्या किबोर्डवर मनी हाइस्टचं गाणं वाजवलं. “जर तुम्ही आयुष्मानला कास्ट करणार असाल तर मला राकेलची भूमिका साकारायची आहे” असं ती या पोस्टमध्ये म्हणते. सोशल मिडीयावर अमृताच्या या व्हिडीओचं प्रचंड कौतुक झालं. मात्र अमृतासाठी एक अविस्मरणीय गोष्ट घडली ती म्हणजे या पोस्टवर चक्क आयुष्मान खुरानाचा रिप्लाय आला. आयुष्मानने अमृताचा हा व्हिडीओ पाहून त्यावर रिप्लाय दिलाय.

आयुष्मानने टाळ्या वाजवण्याचा स्मायली तिच्या पोस्टवर पोस्ट केला  आहे. आयुष्मानचा रिप्लाय पाहून अमृतानेही रडण्याचा स्मायली पोस्ट केला. अर्थात आयुष्मानचा रिप्लाय पाहून ती आनंदाने रडली असेल एवढं नक्की. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive