सध्या करोनारुपी संकट जगासह आपल्या देशालासुध्दा सळो की पळो करुन सोडतोय. हो करोनायुध्द जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा मोठ्या शर्थीने प्रयत्न करत आहेत. तसंच पंतप्रधानांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन काळ हा खबरदारीपूर्व उपाय म्हणून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.... पण आपले समर आणि सुमी तुम्हाला माहितच आहेत. ते थोडी असे ऐकणार आहेत. करोनाला पळवून लावण्यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.
समर आणि सुमी म्हणजे छोट्या पडद्यावरचे सर्वांचे लाडके मिस्टर आणि मिसेस मुख्यमंत्री यांनी गो..करोना.. गो...चा हटके अंदाजात जप सुरु केला. हा भन्नाट व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. तुम्हीसुध्दा एकदा पाहा आणि खळखळून हसा...कदाचित या दोघांच्या अशा ओरडण्याने करोना कदाचित पळूनही जाईल.
मुख्यंमत्री होण्याचं स्वप्न पाहून जनहितासाठी धडपडणारा समर आणि प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्या पाठीमागे त्याला खंबीर साथ देणारी सुमी ह्यांची ही छोट्या पडद्यावरची कहाणी अल्पावधीतच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. प्रमुख भूमिका साकारणारे अमृता धोंडगे आणि तेजस बर्वे ही जोडी सर्वांचीच लाडकी आहे.