करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन काळ तब्बल ३ मेपर्यंत वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. करोनाला हरवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सर्वच दैनंदिन व्यवहार आज ठप्प आहेत, फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे.
दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. घरी बसूनच चाहत्यांसाठी नवनवीन व्हिडीओ, फोटो पोस्ट करत आहेत एखादा थ्रोबॅक फोटो पोस्ट करत मनोरंजनपर व वातावरण हलकं-फुलकं करण्याचा प्रयत्न करतायत.
सेलिब्रिटींच्या फोटोवर नेहमी कॉमेंट्स व लाईक्सचा पाऊस पडतो. पसंतीची ती एक पावतीच असते. परंतु नेहा पेंडसेने अलिकडे सोशल मिडीयावर काही फोटो अपलोड केले होते. त्यानंतर चाहत्यांकडून अशी काही प्रतिक्रीया आली की, नेहाचा पारा चढला आणि ती प्रचंड संतापली...नेहाने काही दिवसांपूर्वी करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाला तेव्हा, आधीचे फिरायला गेलेल्या ठिकाणचे काही फोटो अपलोड केले होते.
नेहाच्या ह्या फोटोला ट्रोल करत एकाने म्हटलं, लोक इथे करोनाने मरत आहेत आणि तू फोटोशूट करत फिरतेयस…..लोकांची नाही तर मनाची तरी लाज ठेव, ह्यावर नेहा प्रचंड संतापली आणि तिने तिथेच थेट खरपूस समाचार घेत प्रत्युत्तर दिलं, “अक्कल गहाण टाकलीय का हो?...थ्रोबॅकचा अर्थ शोधा आधी”.
जुन्या आठवणींना उजाळा देताना थ्रोबॅक हा शब्द वापरला जातो, कदाचित त्या ट्रोलरला ते माहित नसावं, त्यामुळे नेहाने त्याची चांगलीच शाळा घेतली. ट्रोलर्स आणि नेहा यांचं नातं जुनं आहे. अनेकदा नेहा आपल्या बोल्ड व बिनधास्त फोटोंमुळे ट्रोल होते...शार्दुल बयास या पुण्यातील उद्योगपतीसोबत लग्नगाठ बांधल्यापासून नेहा नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर असलेली पाहायला मिळालीय.