मिथीला पालकरने गायलं हे गाणं, म्हटली “इडा-पिडा जाईल आली”

By  
on  

कला विश्वातील कलाकार सध्या घऱात बसून त्यांचे छंद जोपासताना दिसत आहेत. सध्या या वेळेत सोशल मिडीया हा चांगला पर्याय ठरतोय. आणि याच सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर सध्या विविध गोष्टी पोस्ट केल्या जात आहेत. कलाकार मंडळी विविध व्हिडीओ तयार करुन पोस्ट करत आहेत. 

अभिनेत्री मिथिला पालकरनेही नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मिथिला गाणं गाताना दिसत आहे. ऐरणीच्या देवा तुला हे मराठी गाणं मिथिला या व्हिडीओत गात आहे. शिवाय गाण्यासोबत युकुलेले हे वाद्यही ती या व्हिडीओत वाजवत आहे. सोशल मिडीयावर मिथिलाच्या या व्हिडीओचं आणि विशेषकरुन तिच्या गायनाचं कौतुक होत आहे. 
सध्याच्या जगभरात कोरोनाचा सुळसुळाट आहे. 

मिथिला घरात बसून व्यायामाकडेही लक्ष देत आहे. शिवाय नुकताच तिने पोस्ट केलेला डान्स व्हिडीओही चर्चेत आला होता. या काळात सकारात्मकता पसरवण्यासाठी कलाकारही विविध प्रकारचे सकारात्मक व्हिडीओ पोस्ट करत आहेत.

Recommended

Loading...
Share