By  
on  

आणि किशोरी शहाणे-वीज यांनी शेअर केली ही दु:खद बातमी

आज लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरात कैद आहेत करोना संकट लवकर टळू दे आणि प्रत्येकजण आपापल्या दैनंदिन कामावर रुजू होवो, हीच प्रार्थना सर्वचण करतायत. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण घरीच आहे. हा लॉकडाऊन काळ अभिनेत्री किशोरी शहाणे-वीज  या आपल्या फार्म हाऊसवर कुटुंबियासोबत आधीपासूनच आहेत. परंतु एक दु:खद  घटना नुकतीच घडल्याची बातमी त्यांनीच सोशल मिडीयावरुन दिली आहे. 

किशोरी यांचं मुंबईतील ऑफीस उध्दवस्त झालं आहे. जुहू परिसरातील त्यांच्या ऑफीसच्या आवारात असलेलं मोठं बदामाचं झाड ऑफीसवरच कोसळलं व ही दुर्घटना घडली. सुदैवाने आता ऑफीस बंद असल्याने कोणालाही इजा पोहचली नाही. 

किशोरी शहाणे-वीज यांच्या माध्यमांसोबतच्या मुलाखती, आगामी प्रोजेक्ट्स संदर्भतील मिटींग्ज किंवा इतर कामकाज येथे व्हायचं त्यामुळे शूटींगनंतरचा बराचसा वेळ त्या इथेच असायच्या. पण सुदैवाने ही दुर्घटना घडली तेव्हा कोणी नव्हते. 

इन्स्टाग्रामवरुन ऑफीस दुर्घटनेचे फोटो पोस्ट करत किशोरी ताईंनी ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहचवली
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive