By  
on  

तुम्हीही घरीच सुरक्षित राहा, मेव्हणे आणि मेव्हण्यांच्या पाहुण्यांना देखील सांगा : महाराष्ट्र पोलिस

सध्या करोनाने जगभर धुमाकूळ घातला आहे. तर महाराष्ट्रात तर त्याचं थैमान सुरुच आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत. रविवारीच करोना रुग्णांच्या संख्येत तब्बल ४५० च्या वर रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे  करोनाचा वाढता प्रसार व ही साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शर्थीचे प्रयत्न केले  जात आहेत. पोलिस तर  स्वतची व स्वताच्या कुटुंबियांची पर्वा न करता आपल्यासाठी अहोरात्र झटतायत.

पण काही महाभाग हे सरकारी सूचना, नियमांचं पालन करता बिनधास्त व बिनकामाचे रस्त्यांवरुन फिरताना पाहायला मिळतात व मग पोलिसांच्या शिक्षेचा चांगलाच प्रसादही त्यांना मिळतो. एक सुजाण नागरिक म्हणून घरी राहूया व करोनाला हरवूया हे आपण सर्वांनी आपली  व इतरांची सुरक्षा म्हणून अवलंबलं पाहिजे व यंत्रणांवरचा ताण हलका केला पाहिजे. 

नेटकऱ्यांच्या आणि तरुणांच्या आवडत्या कार्यक्रमांचा आधार घेत घरीच थांबण्याचे आवाहन करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांनी आता आपला मोर्चा मराठी सिनेमांकडे वळवल्याचे चित्र दिसत आहे. हजरजबाबीपणा व विविध कल्पकता वापरुन मुंबई पोलिस आवाहन करताना नेहमी पाहायला मिळतात. नटरंग सिनेमाचे वाजेल की बारा , त्यानंतर धनंजय माने आणि आता महाराष्ट्र पोलिसांची अनोखी दुनियादारी पाहायला मिळतेय.

‘तेरी मेरी यारी दोघेही राहू घरी’ अशी भन्नाट कॅप्शन महाराष्ट्र पोलिसांनी दुनियादारीतील एका सीनच्या शॉटवर लिहून तो फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दिग्या श्रेयसला घरी थांबण्याचं आवाहन करत असल्याचे दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना पोलिसांनी, “दिग्या, श्रेयस आणि अख्खी गँग कट्ट्यावर फिरकलेच नाही आहेत कित्येक दिवस,” असं म्हटलं आहे. व याच सिनेमातला प्रत्युत्तरादाखल संवादाचा वापर आवाहनासाठी करण्यात आला आहे. तु”म्हीही घरीच सुरक्षित राहा, मेव्हणे आणि मेव्हण्यांच्या पाहुण्यांना देखील सांगा.”

  

·
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive