By  
on  

लॉकडाउनमध्ये मानसी आणि बॉयफ्रेंड प्रदीप असा घालवत आहेत एकत्र वेळ

अभिनेत्री मानसी नाईकने याच वर्षी तिच्या वाढदिवसाला तिच्या रेलिशनशीपविषयी खुलासा केला. बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं तिने सोशल मिडीयावर पोस्ट करुन सांगीतलं होतं. 
नुकत्याच पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह लाईव्ह मुलाखतीत सध्या दोघं घरात बसून काय करत आहेत याविषयी त्यांनी सांगीतलं. 

p>
मानसी आणि प्रदीप हे गोड कपल सध्या लॉकडाउनमध्ये एकत्र राहत आहे. दोघांच्या परिवाराच्या परवानगीने दोघांनी या लॉकडाउनमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान मानसी विविध पदार्थ बनवून प्रदीपला खाऊ घालत असल्याचं प्रदीपने यावेळी सांगीतलं. शिवाय प्रदीप हा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर असल्याने तो मानसीला सेल्फ डिफेन्स टेक्निकही शिकवतो. मानसी ही हुबेहुब अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सारखी दिसत असल्याचं बोललं जात. मात्र प्रदीपला मानसी ही ऐश्वर्या राय बच्चन पेक्षाही जास्त सुंदर असल्याचं वाटतं, असं तो या लाईव्ह मुलाखतीत म्हटला आहे. चाहत्यांनी यावेळी दोघांच्या लग्नाविषयी विचारलं असता लवकरच या गोष्टीचा खुलासा करू असं दोघंही म्हटले. मात्र “मी मानसीसोबत उद्याही लग्न करायला तयार आहे, मी वाट बघतोय कधी लग्न करणार याची”, असही तो यावेळी गंमतीत म्हटला.  

 

मानसी आणि प्रदीप हे मराठी इंडस्ट्रीतलं सध्याचं चर्चीत असलेलं कपल असून सोशल मिडीयावर दोघांचे विविध फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात. टिक टॉक या ऐपवरही दोघांचे व्हिडीओ पसंत केले जातात. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive