या मराठी कलाकाराने लहानपणी केलय या दिग्गज कलाकारांसोबत काम 

By  
on  

लॉकडाउनचा हा काळ सोनेरी क्षणांना पुन्हा अनुभवण्याची संधी घेऊन आलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या काळात घरात बसून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचीही संधी मिळाली आहे. 
कला विश्वातील काही कलाकार या निमित्ताने त्यांचे जुने फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत. एवढच नाही तर त्या फोटोंमागची कहाणीही सांगत आहे.

अभिनेता पुष्कर जोगनेही त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. पुष्करने लहानपणी बालकलाकार म्हणून काम केलं आहे. याच गोड आठवणी त्याने या निमित्ताने शेयर केल्या आहेत. सलमान खान, ऋषी कपूर, गोविंदा, दादा कोंडके, सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे फोटो त्याने पोस्ट केले आहे. या पोस्टमध्ये पुष्कर लिहीतो की, “दादा कोंडके यांच्या ‘साहेब वाजवू’ का ते ऋषी कपूर यांच्यासोबत ‘हम दोनो’ सिनेमात स्क्रिन शेयर करेपर्य़ंत. गोविंदा आणि सलमान भाई यांच्यासोबतही परफॉर्म करायला मजा आली. माझे गुरु सचिन पिळगावकर यांच्याविषयीही मी कृतज्ञता व्यक्त करतो. देवाचे आभार आणि माझ्या आई-वडिलांनाही धन्यवाद.”

 
 

Recommended

Loading...
Share