By  
on  

सुबोध भावेला मिळाली ही उत्तम संधी, करणार मराठी सिनेसृष्टीचं प्रतिनिधित्व

सुबोध भावे हा एक हरहुन्नरी अभिनेता आहे. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. मालिका असो वा सिनेमा त्याने अभिनयाची चुणूक सर्वत्र दाखवली आहे. लोकमान्य टिळक, बालगंधर्व, ...आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकरांसारखे बायोपिक असोत किंवा तुला पाहते रे सारखा डेलीसोप. सुबोधला या व्यक्तिरेखांमधून लोकप्रियता मिळाली आहे. तुला पाहते रे या डेलीसोपमधील विक्रांत सरंजामे या व्यक्तिरेखेने आज घराघरात स्थान मिळवलं आहे

आता सुबोधच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सुबोध आता ‘इंडिवूड फिल्म फेस्टीवल’ मध्ये मराठी सिनेसृष्टीचं प्रतिनिधित्व करणार आहे. सुबोध या संधीमुळे भलताच खुष आहे. हैद्राबादमध्ये पार पडत असलेलं हे इंडिवूड फिल्म फेस्टीवल पाच दिवस चालणार आहे. हे या फेस्टीवलचं चौथं वर्षं आहे. या वर्षीच्या फेस्टीवलमध्ये १०० देशातील २०० चित्रपट दाखवले जाणार आहेत. या प्रदर्शनात जवळपास ५००० प्रतिनिधी आहेत.

या फेस्टीवलमध्ये अभिनेत्री कल्की कोचालिन आणि कमल हसनदेखील सहभागी होणार आहेत. कल्की हिंदी सिनेसृष्टीचं प्रतिनिधित्व करत आहे. तर कमल हसन तमिळ सिनेसृष्टीचं प्रतिनिधित्व करत आहे.

https://twitter.com/subodhbhave/status/1070323995667513344

Recommended

PeepingMoon Exclusive