By  
on  

Lockdown : प्रिया बापट पती उमेश कामतचा फोटो शेअर करत म्हणते....

करोनाचं थैमान  सुरुच आहे. आपल्या देशात आणि राज्यातही तो धुमाकूळ घालतोय. पंतप्रधानांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन काळ वाढवण्याचा निर्णय घेतला. आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. 

प्रिया बापट आणि  उमेश कामत ही क्युट सेलिब्रिटी जोडी तुम्हा-आम्हा सर्वांचीच लाडकी आहे. दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. आयुष्यातले अनेक अनुभव,प्रसंग ते चाहत्यांसोबत शेअर करतात. कधी एकत्र स्वयंपाक करताना तर कधी वर्कआऊट करतानाचे त्यांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. 

प्रियाने नुकताच उमेशसोबतचा घरातूनच एक गोड फोटो पोस्ट केला आहे. त्यात तिने कॅप्शनसुध्दा खुप रोमॅण्टीक आणि छान दिलं आहे. प्रिया म्हणते, "देवाचे आभार....उमेश या लॉकडाऊनमध्ये तु माझ्यासोबत आहेस." खरंच दोघंही अगदी मेड फॉर इच अदर आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

I am sorry my eyes weren’t enough to show you that I love you @umesh.kamat @aashu.g

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

दरम्यान,प्रिया-उमेश यांची  लोकप्रिय वेबसिरीज ‘आणि काय हवं’चा दुसरा सीझन अलिकडेच मॅक्स प्लेअरवर रसिकांच्या भेटीला आला आहे. त्यालासुध्दा पहिल्या सीझन इतकाच भरघोस प्रतिसाद मिळतोय. 

तसंच लॉकडाऊन स्पेशल नवरा-बायको हा भाडीपचा खास व्हिडीओ प्रिया-उमेशने घरुनच शूट केलाय, तोसुध्दा एकदा नक्की पाहा. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या lockdown मधे घरकाम करता करता आम्ही अभिनय कसा करायचा हे विसरू नये म्हणून नवरा बायकोंची खऱ्या आयुष्यातील नाटकं, आम्हाला आमच्याच घरात, shoot करण्याची संधी भाडिपा @bhadipa ने दिली. आणि काय हवं?? . LINK IN THE BIO . P.S आमचं Work From Thank you Baba and Pradnya who helped us shoot the video. Thank you @omkaarjadhav @abhayraut @anusha.nandakumar @sarangsathaye @dev_paula #quarantinecouple #lockdown #workfromhome #bhadipa

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive