By  
on  

रिंकू म्हणते “मला बोलू सुद्धा देत नाही ही मॅडम..” पाहा काय म्हणतेय रिंकू 

‘सैराट’ फेम रिंकू राजगुरु लवकरच वेब प्लॅटफॉर्मवर दिसणार आहे. सैराटी, कागर, मेकअप हे मराठी सिनेमा केल्यानंतर रिंकू आता वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. 'हंड्रेड' असं या वेब सिरीजचं नाव आहे. यात रिंकू राजगुरु, करण वाही, लारा दत्ता मुख्य भूमिकेत असतील. 

मात्र नुकताच या तिघांनी केलाय कॉन्फरन्स कॉल. लॉकडाउनमध्ये या शोचं प्रमोशन करण्याची हटके कल्पना या टीमला सुचली आणि या तिघांनी चक्क कॉन्फरन्स कॉलच केला. आता 'हंड्रेड' या शोचं प्रमोशन कसं करायचं यावरून या तिघांची चर्चा या व्हिडीओत सुरु आहे. मात्र लाराने रिंकूच्या सगळ्या आयडियाचं रिजेक्ट केल्यात. मग काय दोघी भांडण करून या कॉन्फरन्स कॉलवरून निघून गेल्या. आणि बिचारा करण एकटार राहीला. या कॉन्फरन्स कॉलची ही सगळी खटाटोप आहे या वेब सिरीजच्या प्रमोशनसाठी. कारण सध्या लॉकडाउनमध्ये प्रमोशनच्या वेगवेगळ्या युक्त्या सुचवल्या जात आहे. आणि या टीमनेही काहीतरी नवं करु पाहिलयं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

kindness is free sprinkle it everywhere Pic:@saneshashank

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

वेब सिरीज करण्याची रिंकूची ही पहिलीच वेळ आहे. नेत्रा नावाच्या भूमिकेत रिंकू या वेब सिरीजमध्ये दिसेल.नुकताच रिंकूने हा प्रमोशनल कॉन्फरन्स कॉल व्हिडीओ पोस्ट केला आहे. या वेब सिरीजचा ट्रेललरही लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं रिंकूने या पोस्टमध्ये लिहीलय.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive