By  
on  

रिंकू राजगुरुचं कधी न पाहिलेलं रुप, पाहा ‘हंड्रेड’चा ट्रेलर 

‘सैराट’ची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेली रिंकू आता वेब प्लॅटफॉर्मवर पदार्पण करतेय. डिझनी हॉटस्टारच्या ‘हंड्रेड’ या वेब सिरीजमध्ये ती नेत्रा पाटील ही भूमिका साकारतेय. 

नुकताच या वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रिंकू राजगुरुच्या वेब सिरीजचा हा ट्रेलर व्ह्यूवर्सना चांगलाच आवडतोय. रिंकू राजगुरु यात एक्शन करतानाही दिसतेय. नेत्रा पाटीलचं सिंगापूर जाण्याचं स्वप्न आहे. तिचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला कोण मदत करतं? आणि हे स्वप्न पूर्ण होतं का याची गंमत या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळेल. शिवाय नेत्राला मेंदूचा ट्यूमर आहे. तिच्याकडे फक्त 100 दिवस उरले असल्याचं तिला डॉक्टर सांगतात. या शंभर दिवसात नेत्रा काय काय करते हे या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळेल. 


रिंकू राजगुरुसोबत या वेब सिरीजमध्ये लारा दत्ता, करण वाही, अरूण नलावडे, मकरंद देशपांडे आणि इतर कलाकार आहेत. रिंकूने या वेब सिरीजमध्ये लारा दत्तासोबत स्क्रिन शेयर केली आहे. लारा दत्ता या सिरीजमध्ये पोलिस अधिकारीच्या भूमिकेत आहे. येत्या 25 एप्रिल रोजी  ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive