जगभरात २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून साजरा होतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा दिवस साजरा करतात.आज करोनामुळे सर्व जगच लॉकडाऊन आहे. त्यामुळे प्रदूषण रोखण्यात बरंच यश आलं आहे. निसर्ग पुन्हा नव्याने बहरु लागलाय. वन्य जीव मुक्त संचार करु लागले आहेत तर पृथ्वीवरची जलसंपदासुध्दा स्वच्छ व समृध्द होत आहे.
आपल्या अधिवासाचा गाभा म्हणजे ही पृथ्वी आहे असं म्हटलं तर चुकिचं होणार नाही. त्यामुळेच आज जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. या दिवशी पर्यावरणाबाबत जागरुकता करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा पर्यावरण संवर्धन चळवळींमध्ये कलाकारांचाही सक्रिय सहभाग असतो. पाहुयात कोणकोणते कलाकार कलेसोबतच जपत आहेत पर्यावरणाशी बांधिलकी.
सयाजी शिंदे:
मातीशी, पर्यावरणाशी इमान राखाणा-या कलाकारांमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. पर्यावरण संवर्धनामध्ये सयाजी यांचा सक्रिय सहभाग असतो. याशिवाय अलीकडेच पार पडलेल्या वृक्ष संमेलनाच्या आयोजनामागेही त्यांचा सक्रिय सहभाग होता.
— sayaji shinde (@SayajiShinde) February 9, 2020
सुयश टिळक
अभिनेता सुयश टिळक खुप मोठा पर्यावरणप्रेमी असल्याचं वेळोवेळी त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन प्रत्यय येतो.
दिया मिर्झा:
माझी मिस एशिया पॅसिफिक असलेली दिया सक्रिय पर्यावरण अॅक्टीव्हिस्ट आहे. दिया अनेकदा चाहत्यांना पर्यावरण संवर्धना विषयी जागरुक राहण्याचं आवाहन करत असते.
शशांक केतकर:
शशांक केतकरला प्राण्यांविषयी विशेष सहानुभुती आहे. शशांकला मुक्या प्राण्यांबाबत खुप प्रेम आहे. भटकी कुत्री किंवा इतर प्राण्यांच्या हक्कासाठी तो सदैव कार्यरत असतो.
राकेश बापट:
राकेश इको फ्रेंडली लाईफ स्टाईल जगण्याला जास्त प्रोत्साहन देतो. याशिवाय सण एको फ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याकडेही त्याचा कल असतो.