संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल 3 मेपर्यंत लॉकडाऊन काळ वाढवला आहे.
आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. बबड्याची आई पण या काळात नवनवीन रेसिपी करतेय आणि त्या शेयरही करतेय.आता कदाचित तुम्हाला एक सेकंद कोण बबड्याची आई असा प्रश्न पडला असेल ...तर अग्गबाई सासुबाईमधील आसावरी अभिजीत राजे माहितीय ना...हो तीच बबड्याची आई, म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ या वेळेचा उपयोग विविध पदार्थ करण्यासाठी करत आहेत.
निवेदिता सराफ यांना अभिनयाप्रमाणेच कुकिंगची प्रचंड आवड असून सध्या त्या घरी राहून वेगवेगळे नवीन पदार्थ करुन पाहत आहे. हे पदार्थ करतानाचे व्हिडीओदखील ते चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असून त्यांना या रेसिपी करुन पाहण्याचंही सांगत आहेत.तसंच त्यांच्या या रेसिपीसाठी खास युट्यूब चॅनेलही आहे. त्यांच्या प्रत्येक रेसिपीवर चाहते लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव करतायत.
निवेदिता यांनी ह्या व्हिडीओद्वारे सर्वांना घरी राहण्याचं आवाहन केलं आहे, सर्वचडण पुन्हा अगंबाई सासूबाई मालिकेच्या पुढील भागांची आतुरतेने वाट पाहतायत.