By  
on  

राहुल देशपांडे यांनी गायली ही गजल, व्हिडीओ एकदा पाहाच

लॉकडाउनमध्ये घरात बसून विविध गोष्टी लोक करत आहेत. त्यातच कला विश्वातील कलाकार, गायक हे या वेळेचा चांगलाच सदुपयोग करत आहेत. आणि घरात बसूनच त्यांच्या चाहत्यांचं, प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

सोशल मिडीया हा सध्याच्या लॉकडाउनमध्ये कलाकारांना प्रेक्षकांशी आणि चाहत्यांसी जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरलाय. कारण सोशल मिडीयाच्या माध्यमातून कलाकार घरातच काहीना काही व्हिडीओ तयार करुन पोस्ट करत आहेत. भारतीय शास्त्रीय गायक राहुल देशपांडे हे देखील सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रोत्यांचं मनोरंजन करत आहेत. त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर आणि यू ट्यूबवर विविध गाणी, गजल यांचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत. नुकतीच त्यांनी जगजीत सिंग यांनी गायलेली बात निकलेगी तो फीर ही गजल गायली. आणि त्याचा व्हिडीओ पोस्ट केला. घरातच हे व्हिडीओ तयार करून पोस्ट केल्याने याचा आनंद इतरांनाही घेता येत आहे. 

काफिल अजर यांची नज्म आणि तिही राहुल देशपांडे यांच्या आवाजात असल्याने हा व्हिडीओ मंत्रमुग्ध करतोय. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive