करोनाचा वाढता कहर सुरु आहे आणि त्यामुळे देशभर लॉकडाऊन काळ जाहीर करण्यात आला आहे, आपल्याला घराबाहेर पडण्यास बंदी आहे. पण या लॉकडाईन दरम्यान तुमची लाडकी सई ताम्हणकर मात्र एकदम सही झाली आहे.
सईच्या चाहत्यांसाठी खरं तर ही आनंदाची बातमी आहे. सईच्या पायाला मिमी सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली होती आणि आता तिचा पाय पूर्णपणे बरा झालेला आहे व ती एकदम ठणठणीत झालीय, पण या लॉकडाऊन काळात सर्वांप्रमाणेच सईसुध्दा घरातच आहे.‘मिमी’ या हिंदी सिनेमात अभिनेत्री सई ताम्हणकर झळकणार आहे. या सिनेमात क्रिती सनॉन, पंकज त्रिपाठी या कलाकारांसोबत सईची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. राजस्थानमध्ये चित्रिकरणादरम्यान सईच्या पायाला दुखापत झाली.
अभिनेत्री सई ताम्हणकर ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी रिएलिटी शोची परिक्षक आहे. मिमी सिनेमाचं चित्रीकरण संपंवून ती या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी परत आली. निर्मात्यांचं नुकसान होऊ नये म्हणून सईने पायाला दुखापत असतानाही या कार्यक्रमाचं चित्रीकरण ३१ मार्चपर्यंत पूर्ण केलं होतं.
मराठीतली बोल्ड, बिनधास्त व आघाडीची नायिका अशी सई ताम्हणकरची ओळख. पण तुमची लाडकी सई आता बॉलिवूडमध्येसुध्दा आपल्या अभिनयाची चुणूत दाखवतेय.