‘सैराट’ सिनेमानंतर ज्या अभिनेत्रीचं आयुष्यचं बदललं ती म्हणजे रिंकू राजगुरु. अजूनही सैराटची आर्ची अशी तिची ओळख आहे. मात्र ही ओळख न बदलता आणि एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळख मिळवण्यासाठीची रिंकूची धडपड सध्या सुरु आहे. आणि म्हणूनच ती विविध काम करू पाहयतेय.
‘हंड्रेड’ या हिंदी वेब सिरीजमधून रिंकू राजगुरु वेब प्लॅटफॉर्ममध्ये पदार्पण करतेय. या वेब सिरीजमध्ये रिंकूची नेत्रा पाटील ही भूमिका आहे. रिंकू यात अभिनेत्री लारा दत्ता, करण वाही, मकरंद देशपांडे आणि बऱ्याच कलाकारांसोबत स्क्रिन शेयर करताना दिसेल.
रिंकूने नुकतच या वेब सिरीजच्या सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत. या सेटवर तिने कशी मस्ती केलीय हे या फोटोंवरून पाहायला मिळतय.