By  
on  

Happy Birthday Sachin : दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिला त्या सोनेरी आठवणींना उजाळा 

आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस असल्याने सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत रत्न सचिनसोबतचे फोटो आणि त्याच्यासोबतच्या आठवणींना सोशल मिडीयावर शेयर केलं जातय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तो खेळायचा तेव्हा संपुर्ण देश आनंदाने लाॅकडाऊन व्हायचा. तो शतकाच्या जवळ आला की स्वेच्छेने संचारबंदी लागायची. संपुर्ण देशातील नागरिकांच्या कुटूंबाचा एक सदस्य असणाऱ्या @sachintendulkar यांस वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा ♥️ ( सचिन यांनी माझे नटरंग, बालगंधर्व, बालक-पालक, टाइमपास हे चित्रपट आवर्जून पाहिले. सोबतची पहिली दोन छायाचित्रे नटरंगच्या आणि बालक-पालक शो चे आहे. तिसरे आम्ही केलेल्या एका जाहिराती दरम्यानचे आहे ) @atharva_j2000 @meghana_jadhav

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

दिग्दर्शक रवी जाधव यांनीही सचिनसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सचिनसोबतचे काही फोटो पोस्ट करत त्यांनी सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने त्यांचे कोणकोणते सिनेेमे पाहिले रवी जाधव पोस्टमध्ये म्हणतात, “तो खेळायचा तेव्हा संपुर्ण देश आनंदाने लॉकडाऊन व्हायचा. तो शतकाच्या जवळ आला की स्वेच्छेने संचारबंदी लागायची. संपुर्ण देशातील नागरिकांच्या कुटूंबाचा एक सदस्य असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांस वाढदिवसाच्या करोडो शुभेच्छा  ( सचिन यांनी माझे नटरंग, बालगंधर्व, बालक-पालक, टाइमपास हे चित्रपट आवर्जून पाहिले. सोबतची पहिली दोन छायाचित्रे नटरंगच्या आणि बालक-पालक शो चे आहे. तिसरे आम्ही केलेल्या एका जाहिराती दरम्यानचे आहे )”

Author

Recommended

PeepingMoon Exclusive