By  
on  

ही अभिनेत्री डोळ्यांनी करते घायाळ, चक्क कोरोनालाच केली विनंती

‘मिर्झ्या’ सिनेमातून बॉलिवुड डेब्यू करणाऱ्या अभिनेत्री सयामी खेरचे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच चर्चेत असतात. अनील कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरसोबत तिने या सिनेमातून डेब्यू केला होता. 
सयामी चे डोळे सुंदर डोळे असल्याने तिच्या फोटोंमधील अदा या तरुणांना घायाळ करणाऱ्या असतात. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Corona please please go away. . #lockdown #currentmood #quarantinelife @bhumikab

A post shared by Saiyami Kher (@saiyami) on

नुकतच सयामीने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सयामीने एक विनंती केली आहे. ही विनंती आहे कोरोनाला. ती म्हणते की,  “कोरोना कृपया करुन निघून जा.” अशी विनवणी ती करत आहे.
‘माऊली’ या मराठी सिनेमातही सयामी झळकली होती. या सिनेमात ती अभिनेता रितेश देशमुखसोबत झळकली होती. ‘रे’ या तेलुगू सिनेमातही सयामीने काम केलं आहे. 

शिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्पेशल ऑप्स’ या वेब सिरीजमध्ये सयामीची महत्त्वाची भूमिका आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive