लॉकडाउनमुळे सतत व्यस्त असणाऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे. मनोरंज विश्वातील शुटींग मध्ये व्यस्थ असणारे कलाकारही या निमित्ताने कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.
अभिनेता स्वप्निल जोशीही या लॉकडाउनमध्ये त्याच्या परिवारासोबत आहे. स्वप्निल आपल्या मुलांसोंबत यानिमित्ताने चांगलीच मस्ती करतोय. त्यांच्यासोबतचे व्हिडीओही पोस्ट करतोय. मात्र नुकतच त्याने एक गोड पोस्ट केली आहे. ही पोस्ट आहे त्याची मुलगी मायरासोबतच्या नात्याची. स्वप्निलने या पोस्टमध्ये मुलगी मायराने लिहीलेल पत्र पोस्ट केलं आहे. पेपरवर रेखाटलेल्या या रेषा म्हणजे या मायराचं वडिल स्वप्निल जोशीसाठी हे पत्र आहे.
This is Maayraz first letter to me!
प्रेमात काही न बोलता सगळं कळतं म्हणतात ते हेच ! #swapniljoshi #maayra #quarantine #lockdown #love #daughter #pure pic.twitter.com/eYKvDA2rE0— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) April 27, 2020
या पोस्टमध्ये स्वप्निल लिहीतो की, “मायराकडून माझ्यासाठी हे पहिलं पत्र आहे.प्रेमात काही न बोलता सगळं कळतं म्हणतात ते हेच !”स्वप्निलने राघव आणि मायराच्या गोड आठवणींचा साठाही करुन ठेवलाय. त्याने पिल्लू टिव्ही हे युट्यूब चॅनल सुरु करुन यात स्वप्निलचे मुलांसोबत व्हिडीओ पाहायला मिळतात.