'झपाटलेला' हा १९९३ साली रसिकांच्या भेटीला आलेला सिनेमा. आज जरी या सिनेमातल्या तात्या विंचू आठवला तरी प्रचंड थरकाप उडतो. पण लक्ष्या आणि त्याच्या या बोलक्या बाहुल्याने तेव्हा आणि आत्ताही धम्माल उडवून दिली . महेश कोठारे दिग्दर्शित 'झपाटलेल्या तात्या विंचूच्या' मागे प्रसिध्द बोलक्या बाहुल्यांचे निर्माते रामदास पाध्ये यांचा हात होता. याच सिनेमाच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे, तो या फोटोंच्या निमित्ताने.
रामदास पाध्ये यांचा लेक सत्यजित पाध्येला घर आवरताना नुकताच 'झपाटलेला' खजिना सापडला आहे. अहो, म्हणजे 'झपाटलेला' ह्या गाजलेल्या आणि इतिहास निर्माण करण्या-या सिनेमाच्या शूटींगदरम्यानचे काही फोटो सापडले आहेत. सत्यजितने ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. तुम्हालासुध्दा ते पाहून प्रचंड आनंद होईल. चाहत्यांनी फोटोवर लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.
cleaning old cupboards during #lockdown found rare pics from #Zapatlela @maheshkothare @adinathkothare #ramdaspadhye #tatyavinchu #laxmikantberde @BeingMarathi @zeemarathi @ZeeTalkies @ColorsMarathi @LoksattaLive @mataonline @MiLOKMAT pic.twitter.com/85E6Fd17tw
— Satyajit Ramdas Padhye (@satyajitpadhye) April 27, 2020
'झपाटलेला' या हॉरर कॉमेडी सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर आणि किशोरी आंबिये यांच्या यात मुख्य भूमिका होत्या. तात्या विंचू या गुंडाला असा एक मंत्र येतो ज्यांनी तो आपल्या आत्म्याला कोणताही टाकू शकतो व त्या व्यक्तीचा आत्मा बाहुल्यात जाणार असतो...ओम् भट्, स्वाहा...माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात.
सिनेरसिकांना 'झपाटलेला' सिनेमाचे फोटो पुन्हा एकदा पाहून सिनेमाबाबतच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असतील यात शंका नाही.