महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सोशल मिडीयावर पाहायला मिळतोय. आज महाराष्ट 60 वर्षांचा झालाय आणि याच निमित्ताने मराठमोळ्या कलाकारांनी विविध पद्धतिने मानवंदना सादर केली आहे. कुणी नृत्यातून, कुणी गाण्यातून तर कुणी कुटुंबासोबत एकत्र शुभेच्छा देऊन.
प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि क्लासिकल डान्सर मयूर वैद्यनेही या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. मयूरने अर्थातच त्याच्या नृत्यातून शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांची कविता ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’वरील गाण्यावर मयूरने हे नृत्य सादर केलय. मयूरने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये मयूर लिहीतो की, “१ मे महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना नृत्यमय हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिन चिरायू होवो!”
‘युवा डान्सिंग क्वीन’ या डान्स रिएलिटी शोमध्ये मयूर वैद्य परिक्षक म्हणून दिसला. सोशल मिडीयावर त्याचे विविध डान्स व्हिडीओ पाहायला मिळतात.