महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कला विश्वातील कलाकारांनी घरात बसूनच विविध गाणी तयार केली आहेत. या गाण्यांचे विविध व्हिडीओ आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आले आहेत. घरात बसूनही एकजुटीने एकत्र येण्याची सकारात्मकता या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यातच आणखी एक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. 'मी महाराष्ट्र' असे या गाण्याचे बोल आहेत आणि या व्हिडीओत कलाकार, गायक, गायिका पाहायला मिळत आहेत. जवळपास 22 गायक-गायिकांनी मिळून हे गाणं गायलं आहे. तर जवळपास 23 कलाकार या गाण्यात झळकत आहेत. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासह 22 गायक-गायिकांनी हे गाणं गायलं आहे. प्रत्येकाने घरात बसूनच या गाण्याचं चित्रीकरण केलं असून अतिशय सुंदर पद्धतिने हे गाणं प्रेझेंट करण्यात आलय.
महाराष्ट्र 60 वर्षांचा झालेला असताना त्याचा खास सोहळा नाही तर या गाण्यांमधून त्याचं सेलिब्रेशन करण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करता येत नसल्याने घरात बसूनच कलाकार मंडळीही विविध उपक्रम राबवताना दिसत आहेत. अशा व्हिडीओंच्या माध्यमातून सकारात्मकता पसरवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे.