सध्या लॉकडाउनमध्ये बराच कालावधी घरातच असल्याने विविध गोष्टी लोक करत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारही मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत आहेत. मग आधीसारखं नटून, मेकअप करून घराबाहेर करण्याचे हे दिवस नसले तरी काही कलाकार या गोष्टी घरात बसूनही करत आहेत. शेवटी अभिनेत्री या अभिनेत्रीच असतात. असं म्हणतेय अभिनेत्री पल्लवी पाटील.
पल्लवी पाटीलने एक मजेशीर व्हिडीओ नुकताच पोस्ट केला आहे. या व्हिडीओत पल्लवी दररोज सकाळी उठल्यापासून रात्र होईपर्यंत काय काय करतेय हे तिने शुट केलय. मग लॉकडाउन नसताना अभिनेत्री म्हणून ती कशी तयार व्हायची हे देखील पाहायला मिळतय. पण घरात राहूनच ती या सगळ्या गोष्टी करतये. फिटनेससाठी दररोज व्यायामही करतेय. शिवाय हे सगळं केल्यानंतर घरात बसून सगळ्यात महत्त्वाची गोष्टी जी आपण सगळेच करतोय ती म्हणजे घरकाम. होय, पल्लवी घरकामही करतेय. या मेजशीर व्हिडीओमध्ये तिने हे सगळं करून दाखवलय.
या व्हिडीओमधून मनोरंजनासह सकारात्मकताही पाहायला मिळतेय. चाहत्यांनी पल्लवीच्या या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव केलाय.