By  
on  

 या कारणामुळे होतय स्वप्निल जोशीच सोशल मिडीयावर कौतुक

लॉकडाउनमध्ये जुन्या प्रसिद्ध मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आल्या आहेत. रामायण, महाभारत या मालिकांनंतर उत्तर रामायणही प्रसारित करण्यात आलय.

उत्तर रामायणमध्ये अभिनेता स्वप्निल जोशीने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. या मालिकेत स्वप्निलने कुशची भूमिका साकारली होती. आणि या मालिकेच्या प्रसारणानंतर स्वप्निलला या भूमिकेत पाहुन चाहत्यांनी स्वप्निलचं भरपुर कौतुक केलं आहे. सोशल मिडीयावर या मालिकेतील त्याचे सीन, त्याचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करून त्याला या मालिकेविषयी प्रतिक्रिया मिळत आहेत. ज्यांनी ही मालिका त्या काळात पाहिली नव्हती त्यांना आता पाहण्याची संधी मिळाली आहे.

 

लहानपणीचा गोंडस स्वप्निल आणि त्याचा निरागस अभिनय पाहायला चाहत्यांना चांगलीच मजा येतेय.

या लहानपणी साकारलेल्या भूमिकेसाठी पुन्हा बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांकडून मिळणारं हे प्रेम स्वप्निलसाठी या लॉकडाउनमध्ये स्पेशल ठरलं असेल यात शंका नाही.
 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive