By  
on  

‘कोल्हापूर डायरी’ प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा सिनेमा: महेश शेट्टी

कोल्हापूरचं नाव घेतलं तरी डोळ्यासमोर अनेक बाबी तरळून जातात. कोल्हापूरच्याच मातीशी निगडीत असलेला एक सिनेमा जो राजन यांनी दिग्दर्शित केला आहे ‘कोल्हापूर डायरी’ असं या सिनेमाचं नाव आहे. मल्याळम भाषेतील अंगमलाई डायरीज या सिनेमाचा कोल्हापूर डायरी हा रिमेक आहे. या सिनेमातील अभिनेते महेश शेट्टी यांनी पीपिंगमूनशी गप्पा मारल्या. त्यांच्या व्यक्तिरेखेबद्द्ल सांगताना ते म्हणतात,

‘कोल्हापूर डायरीज’मध्ये काम करणं हा अनुभव अतिशय चांगला होता. खरं तर याआधीही ‘बाळकडू’ नावाच्या मराठी सिनेमात मी काम केलं आहे. त्यामुळे मराठी सिनेमांमध्ये काम करणं ही बाब माझ्यासाठी अजिबात नवीन नव्हती.’

‘कोल्हापूर डायरी’मध्ये मी अण्णा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. हा अण्णा मुळचा दक्षिणेतील असला तरी तो कोल्हापूरमध्ये येऊन स्थायिक झाला आहे. कामानिमित्त कोल्हापूरात आलेला अण्णा तिथल्या संस्कृतीशी पूर्णपणे एकरुप झाला आहे’. अण्णाच्या व्यक्तिरेखेला अनेक शेड्स आहेत.’

कोल्हापूरमध्ये काम करण्याचा अनुभव मला नवीन नव्हता. कारण, माझी बहीण कोल्हापूरची असल्याने माझं इथे सतत येणं-जाणं असायचं. त्यामुळे कोल्हापूर माझ्यासाठी अगदी दुसरं घरच आहे.

कोल्हापूर जितकं चांगलं आहे,कोल्हापूरकर देखील प्रेमळ आहेत. त्यामुळे इथे काम करताना खुपच छान वाटलं. याशिवाय इथल्या लोकांची संवाद साधण्याची खास अशी शैली आहे. अण्णाची व्यक्तिरेखा साकारताना मला या भाषेच्या लहेजाचा अभ्यास करावा लागला.

या सिनेमाचे निर्माते वजीर सिंह आणि अवधूत गुप्ते आहेत. अवधुत गुप्ते यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही खुप वेगळा होता. अवधुतजी खुपच मनमोकळ्या स्वभावाचे आहेत. शेवटी सांगायचं झालं तर, ‘हा अत्यंत वेगळ्या विषयाला हात घालणारा आणि प्रेक्षकांना मनापासून आवडेल असा सिनेमा आहे’.

 

Recommended

PeepingMoon Exclusive