मराठी सिनेसृष्टीतील सुंदर व गुणी अभिनेत्री म्हणून उर्मिला कोठारे हे नाव आग्रहानं घ्यावं लागतं. पण तुम्हाला हे माहितीय का अभिनयासोबतच उर्मिला आणखी ्एका कलेत पारंगत आहे व ती कला उर्मिला जीवापाड जपते.
उर्मिलाचं जितकं अभिनयावर प्रेम आहे, तितकंच नृत्यावरही. ती एक उत्तम कथ्थक नृत्यांगना आहे.
उर्मिलाने शुभमंगल सावधान या सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
सोशल मिडीयावरुन उर्मिलाच्या घुंगरुंचा नाद चाहत्यांपर्यंत नेहमी पोहचतो व तेसुध्दा तिला दिलखुलास दाद देतात.
उर्मिला नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. डान्स व्हिडीओज, मुलगी जिजासोबतची खट्याळ मस्ती, पती आदिनाथसोबतचे फोटो शेअर करत असते.
मुलगी जिजाच्या जन्मानंतर उर्मिलाने काही संपूर्ण फक्त तिलाच वेळ दिला आणि आता पुन्हा नव्या जोमाने ती आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करतेय.
जाहिरातींमधूनसुध्दा उर्मिला नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते.
दुनियादारी, काकण, गुरु, मला आई व्हायचंय अशा सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी उर्मिला आता कोणत्या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची सर्वांना उत्सुकता होती.
आता लवकरच ती एकदा काय झालं या सलील कुलकर्णी दिग्दर्शित सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे.