By  
on  

आणि प्राजक्ताला मिळतोय ‘Red Zone’ मध्ये असूनदेखील “Green Zone” मध्ये असल्याचा आनंद

करोनामुळे देशभर लॉकडाउन लागू करण्यात आला. या निर्णयाला आता जवळपास दीड महिना होत आला आहे. केंद्र सरकारनं सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवला असून, १७ मेपर्यंतची आता तारीख देण्यात आली आहे. महाराष्ट्रातही करोनाचा कहर थांबण्याची लवकर तरी चिन्ह नाहीत. त्यामुळे आता सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण घरी आहेत व कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. 

पुण्यात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय तसंच तिथला मृत्यूदरही जास्त आहे. आपल्या महाराष्ट्रात करोनाचा उगम झााला तो पुण्यातूनच. त्यामुळे तेथील नागरिकांवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही घराबाहेर न पडण्याचं काटेकोर आवाहन सर्वांना करण्यात आलं आहे. तसंच दूध व मेडीकल या सेवासुध्दा पुण्यात आता सकाळी दोन तासच उपलब्ध असणार आहेत. पुणे जिल्हा हा रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तरीही अभिनेत्री प्राजक्ता माळी मात्र,  ‘Red Zone’ मध्ये असूनदेखील “Green Zone” मध्ये असल्याचा आनंद घेतेय. 

आश्चर्य वाटलं ना. ..अहो असे चक्रावून नका. प्राजक्तानेच या संदर्भात पोस्ट केली आहे. " ‘Red Zone’ मध्ये असूनदेखील “Green Zone” मध्ये असल्याचा आनंद ..आईने आणि मी बाग नीटनेटकी केली; ती आता अशी दिसते . मी आणि आमची नकटू आता इथेच पडीक असतो. Jealous होऊ नका; ह्यासाठी सांगत असते झाडं लावा, झाडं जगवा"

प्राजक्ता नेहमीच सोसल मिडीयावर सक्रीय असते आणि चाहत्यांच्या संपर्कात राहते. त्यांना चांगल्या गोंष्टींमधून जनजागृती करण्याचा प्रयत्नही करते. यावेळेससुध्दा प्राजक्ताने या पोस्टसोबत खास संदेश दिला आहे. तो म्हणजे,' झाडे लावा,झाडे जगवा'.

घराच्या छान हिरव्यागार बागेत सावलीतच मग प्राजक्ता व तिच्या चिमुकल्या भाचीचा कल्ला सुरु असतो. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive