मराठी माणूस नाटकवेडा आहे याबद्द्ल कोणतंही दुमत नाही. त्यामुळे रंगभूमीवर त्याच्या मनोरंजनासाठी वेगवेगळी नाटकं सादर होत असतात.
मराठी नाटकांचा परीघ दिवसेंदिवस रुंदावत आहे. सामाजिक पासून रहस्यकथेपर्यंत हरेक विषयाला हात घालणा-या नाटकांनी रसिकांना आपलंसं केलं आहे.
‘गुमनाम है कोई’ हे देखील त्याच पठडीतील नाटक. नावावरुनच हे वेगळ्या धाटणीचं नाटक आहे यात शंका नाही. मधुरा वेलणकर-साटम या नाटकात मुख्य भूमिकेत आहे.
भद्रकाली प्रॉड्क्शन तर्फे हे नाटक रंगभूमीवर येत आहे. प्रसाद कांबळी या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. मधुरा व्यतिरिक्त या नाटकात अंगद म्हसकर, शैला काणेकर, प्राजक्ता दातार आणि रोहित फाळके यांच्याही भूमिका आहेत.
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २२ डिसेँबर २०१८ ला गडकरी रंगायतन, ठाणे इथे होणार आहे.