आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. शूटींगला ब्रेक मिळाल्याने ते छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील पाठकबाई म्हणून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री अक्षया देवधरने नुकतेच तिचे काही साडीतले थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. विविध साड्या नेसलेल्या अक्षयाच्या सौंदर्याला यामुळे चार चॉंद लागले आहेत.
करड्या रंगाची साडी व स्लिव्हलेस ब्लाऊज अशा साध्या लुकमध्येही अक्षयाचं सौंदर्य खुललं आहे.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेचं शूटींग हे कोल्हापुरात सुरु असतं. त्यामुळे आता लॉकडाऊनमुळे अक्षयाला आपल्या मालिकेच्या सेटची व सहकलाकारांची खुप आठवण येतेय,
पांढ-या रंगाच्या कांजीवरम साडीमध्ये अक्षयाने हा पारंपारिक लुकने सर्वांचच लक्ष वेधून घेतलंय.
पाठकबाईंची व त्यांच्या तुझ्यात जीव रंगला मालिकेची आता सर्वांनाच आठवण येऊ लागली आहे. करोना संकट लवकर टळू दे व मालिका रसिकांच्या भेटीला येऊ दे ही सदिच्छा