By  
on  

रिंकू राजगुरु बनली गल्ली गर्ल, सेटवर असे मारले सिक्सर

‘हंड्रेड’ या वेब सिरीजची सध्या भरपूर चर्चा आहे. या वेब सिरीजमधून सैराट गर्ल रिंकू राजगुरुने वेब विश्वात पदार्पण केलं आहे. रिंकूने वेब सिरीजमध्ये साकारलेली नेत्रा पाटील प्रेक्षकांना आवडली आहे. यातील रिंकूच्या अभिनयाचही बरचं  कौतुक होत आहे. आणि याच सेटवरची एक खास आठवण रिंकूने शेयर केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Behind the scenes gully me cricket. Gully girl‍️.

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

रिंकूने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत रिंकू हंड्रेड वेब सिरीजच्या सेटवर त्या टीमसोबत क्रिकेट खेळताना दिसतेय. रिंकूचा हा गल्ली क्रिकेट अंदाज नेटकऱ्यांनाही चांगलच आवडतोय. रिंकू गल्ली गर्ल बनून या गल्ली क्रिकेट खेळतानाचा हा तिचा व्हिडीओ आहे. त्यामुळे रिंकूने सेटवर खेळतं वातावरण ठेवलय असही म्हणता येईल. मात्र हे क्रिकेटचा खेळ खेळत असताना या व्हिडीओत रिंकूने बॅट बदलेली पाहायला मिळतेय. नंतर मग छोटी बॅट घेऊन रिंकू क्रिकेट खेळते. 

या पोस्टमध्ये रिंकू लिहीते की, “कॅमेऱ्यामागचे किस्से, गल्ली मध्ये क्रिकेट..गल्ली गर्ल”. हा व्हिडीओ पोस्ट करत स्वत:ला रिंकू गल्ली गर्ल म्हणतेय. रिंकू सध्या लॉकडाउनमध्ये घरीच आहे. आणि 'हंड्रेड'च्या सेटवरील विविध आठवणी सोशल मिडीयावर पोस्ट करतेय.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive