आपल्या आयुष्यातील जवळची व्यक्ती अचानक या जगातून निघून गेली आणि त्या व्यक्तिला शेवटचं अलविदा करण्याची संधी आपल्याला नाही मिळाली ही भावनाच प्रचंड ह्दय पिळवटून काढणारी आहे. अशीच भावना व्यक्त केली आहे अभिनेत्री अमृता सुभाषने. नुकतच अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर हे दिग्गज कलाकार या जगातून निघून गेले मात्र त्यांनी केलेलं काम कायम लक्षात राहणारं आहे. असं असलं तरी त्यांना शेवटचा अलविदा म्हणण्याची संधी कित्येकांना मिळाली नसेल. या गोष्टीशी अनुसरून अमृताने तिच्या आयुष्यातल्या काही गोष्टी व्हिडीओच्या माध्यमातून शेयर केल्या आहेत.
तिने शब्दात मांडलेल्या या भावना व्हिडीओ रुपात आता समोर आणल्या आहेत. हे सांगत असताना आयुष्य हे एका डेली सोप म्हणजेच मालिकांसारखं असतं असं अमृताला वाटतय. ते कसं हे सांगताना तिने बऱ्याच आठवणी सांगीतल्या आहेत. 'अवघाचि संसार' या मालिकेत सोबत काम करणारे सहकलाकार आनंद अभ्यंकर आणि त्यांचं अपघाती निधन याचीही आठवण यावेळी तिने सांगीतली. शिवाय अमृताच्या आयुष्यात झालेला एका अपघाताविषयीही ती बोलली.
जवळची व्यक्ती गमावण्याची भावना आणि त्याला अलविदा न करण्याचं दु:ख हे वेगळं असतच मात्र अचानक घडणाऱ्या घटना या एका डेली सोप सारख्या वाटू लागतात असं अमृता म्हणतेय.