By  
on  

 अभिनेत्री सायली संजीवची ही कला तुम्हाला माहित आहे का ?

लॉकडाउनच्या काळात विविध छंद बहुतांश लोकं जोपासत आहेत. त्यातच दररोजच्या व्यस्ततेमुळे ज्या गोष्टी करता आल्या नाही त्या करण्यासाठीही वेळ मिळाला आहे. अभिनेत्री सायली संजीवही या वेळेचा सुदपयोग करत आहे.

नुकताच सायली संजीवने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत सायली चित्र काढताना दिसत आहे. तिच्या रेखाटलेल्या डूडलचा फोटो तिने पोस्ट केला आहे. चाहत्यांनी सायलीच्या या डूडलचं कौतुक केलं आहे. याशिवाय सायली सध्या पेटी हे वाद्यही शिकत आहे. नुकताच तिने पेटी वाजवतानाचा व्हिडीओही पोस्ट केला होता. 

या लॉकडाउनच्या काळात घरात बसलेले हे कलाकार विविध गोष्टी करुन, त्यांचे छंद जोपासत आणि नव्या गोष्टी शिकत मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत आहेत.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive