अभिनेता अक्षय वाघमारे आणि गँगस्टर अरुण गवळी यांची लेक योगिता गवळी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. नुकतच अक्षयने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर या लग्नाचे काही खास क्षण पोस्ट केले आहेत.
लॉकडाउनमध्ये पोलिसांच्या परवानगीने सोशल डिस्टंसींगच्या नियमांचं पालन करत की मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला होता.
यावेळ स्वत: गँगस्टर अरुण गवळी उपस्थित होते. यावेळी मास्क आणि सॅनिटायझरचा वापरही करण्यात आला. मुंबईतल्या दगडी चाळ येथे हे लग्न पार पडलं.
अक्षय आणि योगिता गेली पाच वर्षे एकमेकांना ओळखतात. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा पार पडला होता.