लॉकडाउनमध्ये घरात राहून करण्यासाठी विविध गोष्टी आहेत मग त्यापैकी काय करायचं? तर काही कलाकार मंडळींनी विविध व्हिडीओ करायचं ठरवलं आहे. घरातच राहून विविध व्हिडीओ शूट करून वेगवेगळ्या थिमवर कलाविश्वातील कलाकार व्हिडीओ तयार करत आहेत. सोशल मिडीयावर तर सध्या कलाकारांचे हे व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.
नुकताच काही अभिनेत्रींनी मिळून एक व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत अभिनेत्री विणा जगताप, समृध्दी केळकर, सरीदा मेहेंदळे जोशी, तितीक्षा तावडे, मयुरी कपाडने, रिचा अग्नीहोत्री झळकत आहेत. घरात राहून या अभिनेत्री काय काय करत आहेत हे या व्हिडीओत पाहायला मिळतय. इतके दिवस घरात असूनही त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य या व्हिडीओतून सकारात्मक ऊर्जा देतय. कुणी पुस्तक वाटतय, नाचतय, घरकाम करतय, व्हिडीओ कॉल करतय अशा विविध गोष्टी या व्हिडीओत दाखवण्यात आल्या आहेत. त्यातच ‘लव्ह यू जिंदगी’ या गाण्यावर हा व्हिडीओ केला असल्याने हा व्हिडीओ सकारात्मक वाटतो. शिवाय घरातच राहण्याचही आवाहन या अभिनेत्री या व्हिडीओतून करत आहेत.