By  
on  

गझलप्रेमी वैभवने सादर केली सुरेश भट यांची ही गझल

लॉकडाउनमध्ये घरात बसलेले बहुतांश लोकं मिळालेल्या वेळेत त्यांचे छंद जोपासत आहेत. तर काही जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. 
अभिनेता वैभव तत्त्ववादी ही लॉकडाउनमध्ये घरातच आहे. मात्र त्याचं गझलप्रेम अधूनमधून तो सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. नुकतच वैभवने त्याच्या मित्रांसाठी गझल सादर केली आहे. प्रसिद्ध कवि सुरेश भट यांची गझल यावेळी वैभव तत्त्ववादीने सादर केली आहे. ही प्रसिद्ध गझल त्याने त्याच्या मित्रांसाठी पोस्ट केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Ghazal Samrat Suresh Bhat #ghazal #poetry #vtofficial #marathi

A post shared by VAIBHAV TATWAWAADI (@vaibhav.tatwawaadi) on

‘आताच अमृताची बरसून रात गेली’ असे याचे शब्द आहेत. वैभवच्या आवाजत ही गझल ऐकायला चाहत्यांना चांगलचं आवडलेलं दिसतय. म्हणूनच वैभवच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Once upon a time .... #throwback #vtofficial #dressedup

A post shared by VAIBHAV TATWAWAADI (@vaibhav.tatwawaadi) on

सोशल मिडीयावर वैभव तत्त्ववादी चांगलाच अपडेट असतो. शिवाय त्याचे गझल व्हिडीओही कधीकधी पाहायला मिळतात.  वैभवने मराठी सिनेमा , मालिकांसह काही हिंदी सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'हंटर', 'बाजीराव मस्तानी', 'लिपस्टीक अंडर माय बुरखा', 'मणीकर्णिका' या हिंदी सिनेमांमध्ये वैभवने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
  
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive