By  
on  

 सई ताम्हणकर आणि चिराग पाटील पुन्हा या कारणासाठी झळकले एकत्र

लॉकडाउनमध्ये बहुतांश गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. मग जीम वैगेर बंद असल्याने ऑनलाईन वर्कआउट ट्रेनिंग घेण्यात येत आहे. त्यातच इन्स्टाग्रामवर लाईव्ह येण्याचं फॅड आलय. यात वर्कआउट, योगा हे लाईव्ह करण्यात येते. 
अभिनेत्री सई ताम्हणकर, चिराग पाटील, प्रतीक पाटील  आणि योगा ट्रेनर चांदनीचा या व्हिडीओत सहभाग आहे. मात्र हा व्हिडीओ विनोदी पद्धतेने करण्यात आला आहे. लॉकडाउनमध्ये घरात बसून कंटाळलेली मंडळी हे लाईव्ह योगा सेशन कसं करतात हे यात विनोदी पद्धतीने दाखवण्यात आलय. यात मग योगा सेशन सुरु असताना सई आंबा घातेय तर कुणी झोपतय. हा मजेशीर व्हिडीओ नुकताच चिराग पाटील आणि सई ताम्हणकरने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओच्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि चिराग पाटील पुन्हा एकदा एकत्र झळकले आहेत. याआधी ‘राडा रॉक्स’, ‘वेकअप इंडिया’ आणि ‘वजनदार’ या सिनेमांमध्ये दोघं एकत्र झळकले होते.प्रतीक पाटील याने या व्हिडीओचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

What really happens ...

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

सध्या लॉकडाउनमध्ये घरात राहूनच विविध मजेशीर व्हिडीओ तयार करण्यात येत आहे. जेणेकरून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग होईलच शिवाय सोशल मिडीयावर कलाकारांच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजनही होईल. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive