संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात लॉकडाऊन काळ आता वाढवण्यात आला आहे.
आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. पण शेवटी या करोना संकटामुळे प्रत्येकाला उद्याची चिंता ही भेडसावतेच, नकारात्मक विचार येत आहेत. म्हणूनच अभिनेता गश्मिर महाजनीने आज सकालीच एक प्रेरणादायी पोस्ट केलीय, त्यामुळे आपलं मनोबल नक्कीच वाढेल.
कितीही संकट ओढवली तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत आत्मविश्वासाने उभं राहायची ताकद प्रत्येकात असायला हवी , असं गश्मिर म्हणतो.
तसंच सतत प्रयत्नशील राहिल्याने लॉकडाऊन पण तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचण्यास थांबवू शकत नाही.