By  
on  

 श्रेयस जाधवने केलं पंजाबी साँग, गाणं प्रदर्शित 

श्रेयस जाधव हा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पॉप सिंगर, रॅपर, निर्माता, दिग्दर्शक म्हणून काम करतो. त्याच्या रॅप साँगमध्ये त्या व्हिडीओंमध्ये दिसणारा चकचकीतपणा हिंदी गाण्यांच्या तोडीस तोड असतो. आणि आता पुन्हा एकदा श्रेयस असचं एक धमाकेदार गाणं घेऊन आला आहे. मात्र यावेळी त्यानं पंजाबी गाणं केलं आहे. श्रेयसचं हे पहिलच पंजाबी गाणं असून नुकतच ते प्रदर्शित झालं आहे. ‘जी मेरा करे’ असे या गाण्याचे बोल आहेत.

 

काही महिन्यांपूर्वीच त्याने हे गाणं अरमानिया येथे शूट केलं होतं. श्रेयसने काही सिनेमांमध्ये त्याचे रॅप साँग गायले आहेत. शिवाय त्याचे काही रॅप व्हिडीओ हे प्रचंड चर्चेत आले होते. निर्मिती क्षेत्रात असताना त्याने ‘मी पण सचिन’ या सिनेमातून लेखन दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive