By  
on  

 आता घरबसल्या पाहता येणार अमेय आणि निपूणचा 'कास्टिंग काउच' शो

सध्या लॉकडाउनमध्ये मनोरंजन विश्वाचं काम, चित्रीकरण थांबलं आहे. मात्र कलाविश्वातील कलाकार घरात राहूनही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी विविध गोष्टी करत आहेत. 
अभिनेता अमेय वाघ हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विविध गोष्टी करताना दिसतोय. सध्या सोशल मिडीयावर दररोज विविध व्हिडीओ तो पोस्ट करतो. शिवाय नुकतच त्याने त्याचं यूट्यूब चॅनल देखील सुरु केलं आहे. यातच त्याने आता नवी घोषणा केली आहे. ही घोषणा आहे त्याचा आणि त्याचा मित्र प्रसिद्ध दिग्दर्शक निपूण धर्माधिकारीच्या प्रसिद्ध शोची. ‘कास्टिंग काउच’ हा प्रसिद्ध शो अमेय आणि निपूण करतात. मात्र हा शो आता ऑनलाईन घरबसल्या पाहता येणार आहे.

 

हा लाईव्ह शो दोघं झूम ऐपवर सादर करणार आहेत. शिवाय या शोचं तिकीट विकत घेऊन हा शो पाहता येणार आहे. येत्या 17मे रोजी हा शो सादर करण्यात येईल. याविषयीच्या पोस्टमध्ये अमेय लिहीतो की, “हया लॉकडाउनमध्ये आपली एन्टरटेन्मेंट कोणी थांबवू शकत नाही ! जो तिकीट काढेल तोच खरा celebrity.” अमेय आणि निपूण हा शो घरबसल्या सादर करतील जो प्रेक्षकांना घरबसल्या  पाहता येणार आहे. या शोचे विविध एपिसोड याआधी युट्यूबवर पाहायला मिळाले होते. तर काही एपिसोडचे शो विविध ठिकाणी करण्यात आले होते. 'कास्टिंग काउच' शोमध्ये विविध दिग्गज मराठी कलाकारांनीही आत्तापर्यंत सहभाग घेतला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive